

घरकुलासाठी स्वतः सर्व्हे केलेल्या
लाभार्थींच्या यादीचे स्वातंत्र्यदिनी वाचन
----
अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः बेघरांना घर मिळावे यासाठी केंद्र शासनाने विशेष पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून घरकुलासाठी काही महिन्यांपूर्वी स्व-सर्वेक्षण केलेल्या व त्यानंतरच्या विशेष समितीच्या पडताळणीत पात्र- अपात्र ठरलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीचे शनिवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिनी वाचन केले जाणार आहे. जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ६३२ लोकांनी घरासाठी सर्व्हे केला होता. त्यातील १ लाख ४६ हजार ८५४ कुटुंब पात्र झालेले आहेत.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांना हक्काचे घर बाधता यावे यासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी घर नसलेल्या कुटुंबाकडून स्व सर्व्हेक्षण (सेल्फ सर्व्हे) करून घेतला होता. त्यानंतर त्या यादीनुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून प्रत्यक्ष तपासणी केली. त्यात सरकारी नोकरीला असलेले, आयकर भरत असलेले व अन्य कारणाने किंवा ज्यांना घर आहे अशा कुटुंबाला अपात्र करुन पात्र-अपात्र ची यादी निश्चित केली आहे. त्या यादीचे शनिवारी (ता. १५) वाचन होणार आहे.
जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ६३२ कुटुंबांनी घरकुलासाठी स्व-सर्व्हे केला होता. त्यातील १ लाख ४६ हजार ८५४ कुटुंबे पात्र झाली तर २७ हजार ६८८ कुटुंबे अपात्र ठरली आहेत. पात्र कुटुंबात सर्वाधिक संगमनेर, कर्जत तालुक्यातील कुटुंबे असून संगमनेर तालुक्यात सर्वाधिक २८१५ कुटूंबे, त्यापाठोपाठ जामखेड तालुक्यात २७३५ कुटुंबे, नेवासा तालुक्यात २५१७, श्रीगोंदा तालुक्यात २४८८, अकोल्यात २३०७, कुटुंबे घरकुलासाठी तपासणीत अपात्र ठरली आहेत. ग्रामसभेत आता या याद्यांचे वाचन होणार आहे.
तालुकानिहाय घरकुलासाठी पात्र कुटुंब
(कंसात एकूण सर्व्हेक्षण केलेले कुटुंब)
अकोले ः १११२९ (१३४३६)
जामखेड ः ११००३ (१३७३८)
कर्जत ः १३५४४ (१५४२४)
कोपरगाव ः ८६४७ (१०३७२)
अहिल्यानगर ः ८०८४ (९९००)
नेवासा ः १२,२७८ (१४८२७)
पारनेर ः १००८५ (११५३८)
पाथर्डी ः ११९०९ (१३५६९)
राहाता ः ७१५९ (८९४५)
राहुरी ः ९११४ (१०६३३)
संगमनेर ः १५१२२ (१७९४४)
शेवगाव ः ८५२३ (१००४९)
श्रीगोंदा ः ९४२२ (११९१९)
श्रीरामपूर ः १०८१५ (१२२३८)
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.