जादा शुल्क आकारले तर खैर नाही; ज्येष्ठ दाम्पत्त्याला मिळालेला सुखद अनुभव वाचाच...

Housing societies to face strict action if they overcharge any member
Housing societies to face strict action if they overcharge any member
Updated on

पुणे : सरकारी कार्यालय म्हटलं की कामास टाळाटाळ... त्यात पुन्हा लॉकडाऊन... असे असूनही सहकार खात्यात सुखद अनुभव आम्ही घेतला. तत्परतेने कार्यवाही झाली आणि तीही प्रत्यक्षात न भेटता ऑनलाईन. गृहनिर्माण सोसायटीने ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) द्यायला दोन आठवडे लावले. ती एनओसी आम्हाला 24 तासांत मिळाली. तीही सरकारी नियमानुसार म्हणजेच 25 हजार रुपये हस्तांतरण शुल्क (ट्रान्स्फर फी) भरून... कर्वेनगर येथील सेवानिवृत्त प्राध्यापिका संजीवनी मुंढे 'सकाळ'शी बोलत होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

प्रा. संजीवनी मुंढे म्हणाल्या, त्यांनी आणि पती डॉ. श्रीराम मुंढे यांनी कर्वेनगर येथे म्हाडाच्या उच्च उत्पन्न गटातून दोन बेडरूमचा फ्लॅट 15 वर्षांपूर्वी घेतला होता. तो आता विकायला काढला असता सोसायटी पदाधिकाऱ्यांनी ट्रान्स्फर फी एक लाख रुपये मागितली. त्यावर मी साफ नकार दिला. याबाबत काही सभासदांना इतके शुल्क आकारणे योग्य नाही, असे सांगितले. त्यावर पदाधिकाऱ्यांनी सहा वर्षांपूर्वी ठराव झाला आहे. तीन-चार लोकांनी दिलेही आहेत, तुम्हालाही द्यावेच लागतील, असे सांगून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास टाळाटाळ केली. 

अशा परिस्थितीत रविवारी सुटी असूनही प्रा. मुंढे यांनी सहकार विभागातील सहनिबंधक विनायक कोकरे यांना फोनवर हा प्रकार सांगितला. त्यांनी कर्वेनगर, कोथरूड येथील उपनिबंधक दिग्विजय राठोड यांचा मोबाईल क्रमांक दिला. सुटीचा दिवस असतानाही त्यांनीही कोणत्याही प्रकारची टाळाटाळ न करता ई मेल आयडी दिला. त्यावर ई मेल केल्यानंतर खरोखर आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशी त्यांनी दखल घेऊन सर्वप्रथम सोसायटीचे चेअरमन यांना फोन करून सरकारी परिपत्रकात दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम ट्रान्स्फर फी मागू शकत नसल्याची समज दिली. त्याच दिवशी माझ्या इ मेलला उत्तरही दिले. सोसायटीला नोटीस काढली. सरकार दरबारी कामाचा सामान्य माणसांना बऱ्याचदा वाईट अनुभव असतो. काम करण्याबाबत टाळाटाळ केली जाते. अशा वेळी लॉकडाऊन कालावधीत सहकार खात्यात इतका सुखद अनुभव आम्हाला मिळाला. 

गृहनिर्माण सोसायट्यांना 25 हजार रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर फी आकारता येत नाही. त्यापेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कलम 79 (3) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येते. संबंधित सोसायटीच्या चेअरमनला याबाबत समज दिली आहे.- दिग्विजय राठोड, उपनिबंधक, पुणे शहर 1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com