विद्यार्थ्यांनो, नीट-जेईईसाठी कसा कराल अभ्यास? वाचा तर...

विद्यार्थ्यांनो, नीट-जेईईसाठी कसा कराल अभ्यास? वाचा तर...
Updated on

पुणे : लॉकडाऊनच्या काळात मुलांकडे वेळ मुबलक आहे. या बदललेल्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना जेईई, नीट यांसारख्या परीक्षांसाठी स्वयंशिस्तीने अभ्यास करावा लागेल. नियोजन योग्य असल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे, उजळणी करणे, जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिकांचा सोडवण्याचा प्रयत्न करणे या माध्यमातून खूप काही करता येऊ शकते. सर्वप्रथम पाठ्यपुस्तकातून संकल्पना स्पष्ट झाल्यानंतरच बहुपर्यायी प्रश्नांना सुरवात करणे हेच योग्य ठरेल. 

बारावीचे पेपर संपले आणि नेमके लॉकडाऊनची घोषणा झाली. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसमोर अनेक संधी सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत, कारण नीट, जेईई, एमएचटी-सीईटी यांसारख्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्याचा फायदा कसा करून घेता येईल याबद्दल करिअर समुपदेशक रिना भुतडा यांनी काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे.

दररोज बहुपर्यायी प्रश्नांवर किमान एक पेपर किंवा एका पाठावर एक टेस्ट रोज व्हावी असा नित्यक्रम विद्यार्थ्यांनी ठेवावा. या माध्यमातून आपल्याला नेमके कोणत्या पाठावर जास्त लक्ष केंद्रीत करावे लागेल ते निश्चितच लवकर कळेल. तसेच कुठल्या पाठावर आपला अभ्यास व्यवस्थित झाला आहे, हे समजेल. प्रत्येक विद्यार्थ्याने फिजिक्स आणि गणित या विषयाचे किमान 70 ते 80 गणिते दररोज सोडविणे गरजेचे आहे, या माध्यमातून या विषयांच्या गणितांचा सराव उत्कृष्ट होऊ शकतो. फिजिक्स, केमिस्ट्रीचे सर्व फॉर्मुले लक्षात ठेवणे, बायोलॉजीच्या सर्व आकृत्या लक्षात ठेवणे, यातून सराव झाल्यास संकल्पना लक्षात ठेवण्यास मदत होईल. या वेळेमध्ये मित्रांसोबत झालेली चर्चा किंवा संवाद या माध्यमातून आपण आपल्या संकल्पना स्पष्ट करू शकतो.

ऑनलाइन व्हिडिओद्वारे किंवा ऑनलाइन टेस्ट सीरिजसारखे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत, तरीसुद्धा नीट किंवा जेईईच्या काठिण्यपातळी प्रमाणेच ते असतील याची खात्री अगोदर होणे गरजेचे आहे. कारण या परीक्षांच्या काठिण्य पातळीनुसारच प्रश्नपत्रिका ही सेट केलेली असावी. कारण ऑनलाइन पद्धतीद्वारे अभ्यास करण्याचा अनेक विद्यार्थ्यांचा हा अनुभव बहुधा पहिला असू शकतो. अनेक विद्यार्थी 'डाऊट क्लिअरिंग' ॲपच्या माध्यमातून बर्‍याच संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मदत सुद्धा घेत आहेत.

पालकांची भूमिका याच काळात शिक्षकांप्रमाणे असणे गरजेचे आहे. कारण घराबाहेर पडणे आता शक्य नाही आणि घरातच राहून अभ्यास करताना विद्यार्थ्याला जास्तीत जास्त पोषक असे वातावरण कसे निर्माण करता येईल हे गरजेचे झालेले आहे.  दोन्ही पालक घरात हजर असल्याने हे शक्य आहे. विद्यार्थ्यांचा पेपर तपासून देणे, चुका या मॉडेल उत्तरपत्रिका बघून निदर्शनास आणून देणे आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचवणे, हे पालकांकडून होऊ शकते. कारण आपण या गोष्टींसाठी क्लास किंवा कॉलेजवर अवलंबून असतो, नेमका तोच वेळ घरी वाचवण्यासाठी पालकांची मदत होणे हे गरजेचे आहे. 

मित्र या काळात सोबत नसल्याने किंवा पूर्ण क्लासमध्ये आपण सराव करत नसल्याने स्वतः आपल्यासोबतच आभासी स्पर्धा करण्याची करण्याची वेळ आलेली आहे. एका शिक्षकांनी शिकवलेले माझ्या लक्षात राहते किंवा मित्रांसोबत अभ्यास केला तर माझ्या लक्षात राहतो, अशा प्रकारची भावना अनेक विद्यार्थ्यांमध्ये असते. आता हे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांना हे समजून घ्यावे लागेल. क्रॅश कोर्सवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा प्रत्यक्ष क्रॅश कोर्स आता उपलब्ध नसल्यामुळे स्वयंअभ्यासाच्या योग्य नियोजनातून मार्ग काढणे अनिवार्य आहे.
यावर्षी प्रथमच एमएचटी-सीईटी परीक्षा ही एप्रिलमध्ये घेण्यात येणार होती. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीकरीता विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळणार होता, कारण दरवर्षी ही परीक्षा मे महिन्यामध्ये घेण्यात येत होती. मात्र लॉकडाऊनमुळे व परीक्षेचे वेळापत्रक पुढे गेल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी तयारी करण्यास भरपूर वेळ मिळणार आहे. त्याचा पुरेपूर फायदा विद्यार्थी घेऊ शकतात.

तसेच दरवर्षी सीईटीच्या दोनशे मार्कांच्या परीक्षेमध्ये शंभरपेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या नऊ टक्क्यांवर कधीही गेलेली नाही, ही संख्या यावर्षी वाढण्यासाठी वेळ उपलब्ध झाला आहे, असा सकारात्मक विचार करण्यास हरकत नाही. योग्य आहार, शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी योग, प्राणायाम, मेडीटेशन केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढीसाठी मदत होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com