esakal | जगप्रसिद्ध लोणार झालाय गुलाबी; हे आहे त्यामागचे कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

जगप्रसिद्ध लोणार झालाय गुलाबी; हे आहे त्यामागचे कारण...

जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचा बदललेला रंग सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरला आहे.

जगप्रसिद्ध लोणार झालाय गुलाबी; हे आहे त्यामागचे कारण...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचा बदललेला रंग सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरला आहे. पर्यावरणाबद्दलची देशातील जागरूकता बघता, निसर्गाचा हा अनमोल ठेवा धोक्यात आला की काय? अशी चिंताही व्यक्त केली गेली. पण सरोवराचे पाणी गुलाबी होणं हि नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे, लोणारचे अभ्यासक आंनद मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लोणारच्या खाऱ्या पाण्यात स्पुरिलीना नावाचे शैवाळ आणि काही बॅक्टरीया मोठ्या प्रमाणावर आढळतात. मागील काही वर्षांचा कमी पाऊस आणि वाढते बाष्पीभवन यामुळे सरोवरातील पाण्याची पातळी घटली आहे. पर्यायाने बॅक्टेरियाचे पिगमेन्टेशन ही जैविक प्रक्रिया होऊन सुरवातीला रंग पिवळा झाला, पण खऱ्यापाण्यात ही स्थिती टिकाव धरू शकली नाही. त्यातील बीटा केरोटीनमुळे पाण्याचा रंग गुलाबी झाला. त्यामुळे पाणी गुलाबी दिसू लागल्याचे मिश्रा यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजेच मे आणि जून महिन्यात अशी स्थिती दिसण्याची शक्यता असते. कारण त्यावेळी पाण्याची कमी पातळी आणि बाष्पीभवन दोन्ही जास्त असते.

ण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

असे जरी असले तरी दिवसेंदिवस लोणार सरोवराच्या कमी होणाऱ्या पाण्याच्या पातळीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. सरोवराच्या आजूबाजूला उभ्या राहिलेल्या मोठ्या आस्थापणामध्ये 'बोर' घेतल्यामुळे पाण्याचे स्रोत कमी झाल्याचे बोलले जात होते. पण अशी स्थिती इथे नसल्याचे मिश्रा यांनी सांगितले.