दहा महिन्यांत रेल्वेला किती सापडले फुकटे प्रवासी पहा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

रेल्वेच्या पुणे विभागात गेल्या दहा महिन्यांत तब्बल १ लाख ४३ हजार विनातिकीट प्रवासी सापडले असून, त्यांच्याकडून सुमारे ८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

पुणे - रेल्वेच्या पुणे विभागात गेल्या दहा महिन्यांत तब्बल १ लाख ४३ हजार विनातिकीट प्रवासी सापडले असून, त्यांच्याकडून सुमारे ८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेल्वेच्या पुणे विभागात पुणे - मळवली, पुणे - बारामती, पुणे - मिरज, मिरज - कोल्हापूर मार्गांवर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात ३ लाख ९ हजार प्रकरणांत १६ कोटी ३ लाख रुपयांचा दंड रेल्वे प्रशासनाने वसूल केला. चुकीचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे, जनरल क्‍लासचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे आदी प्रकरणांचा समावेश आहे. त्यातील एक लाख ४३ हजार प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. गेल्या वर्षी एप्रिल ते यंदाच्या जानेवारी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. 

गेल्यावर्षी याच कालावधीत एक लाख २० हजार विनातिकीट प्रवासी सापडले होते. त्यांच्याकडून ६ कोटी ८७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता. तर वेगवेगळ्या प्रकरणांत एकूण २ लाख ७७ हजार प्रकरणांत प्रवाशांकडून १३ कोटी ४३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How many freeways were found by train in ten months