esakal | Vidhan Sabha 2019 : युती झाल्यास पुण्यात शिवसेनेच्या पदरी किती जागा
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena

एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना नेते करीत असताना दुसरीकडे मात्र आठपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात अद्यापही विभागप्रमुखांच्या अध्यक्षतेखालील कार्यकरिणीची नियुक्ती झालेली नाही. परिणामी, रस्त्यावर उतरून लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेचे काम कागदोपत्रीच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Vidhan Sabha 2019 : युती झाल्यास पुण्यात शिवसेनेच्या पदरी किती जागा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019
पुणे - एकीकडे स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना नेते करीत असताना दुसरीकडे मात्र आठपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात अद्यापही विभागप्रमुखांच्या अध्यक्षतेखालील कार्यकरिणीची नियुक्ती झालेली नाही. परिणामी, रस्त्यावर उतरून लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या शिवसेनेचे काम कागदोपत्रीच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये त्यावर विश्‍वास नाही. युती झाली तरी शिवसेनेच्या पदरी किती आणि कोणत्या जागा पडणार, या बाबतची कल्पनादेखील शहर पातळीवरील नेत्यांना नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या संभ्रमाची अवस्था आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मुलाखतीसाठी आलेले भाजपचे निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणुका लढल्या, तर काय होऊ शकते, याचा आढावा घेतला. त्यामुळे शहर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पातळीवर नेमके काय चालले आहे, याबाबत शिवसेनेचे ‘वाघ’ अंधारातच  आहेत.

loading image
go to top