Papon Concert Pune: मोह मोह के धागे..! पुण्यात रंगणार पापोन यांची सुरेल मैफिल, कसे कराल बुकिंग?
पुणे, ता. २२ : अलवार आवाजाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे प्रसिद्ध गायक पापोन यांची मैफील पुण्यात रंगणार आहे. ‘मोह मोह के धागे’, ‘क्यूं’, ‘बुलेया’ यांसारख्या गीतांनी घराघरांत पोहोचलेले गायक पापोन यांची ‘पापोन- लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ही मैफील २३ मे रोजी होणार आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे सायंकाळी ७ वाजता ही मैफील रंगणार आहे. यासाठी ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे फायनान्स पार्टनर तर ‘द नेचर- मुकाईवाडी’ हे सहयोगी प्रायोजक आहेत.
कार्यक्रमाचे तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा
https://in.bookmyshow.com/events/papon-live-in-concert/ET00440322
पापोन, म्हणजेच अंगाराग महंत, हे आसाममधील प्रथितयश गायक-संगीतकार असून पारंपरिक आसामी संगीतासोबत त्यांनी हिंदी, बंगाली, पंजाबी अशा विविध भाषांमध्येही सादरीकरण केले आहे. त्यांच्या भावनाप्रधान आणि आत्मीय सादरीकरणासाठी ते विशेष ओळखले जातात.
गेल्या काही वर्षांत ‘सकाळ’ने पुण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी अनेक बहुरंगी सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सोनू निगम, श्रेया घोषाल, जावेद अली, अन्नू कपूर, स्वानंद किरकिरे यांच्यासारख्या कलाकारांचे कार्यक्रम, तसेच ‘शहेनशहा’, ‘नक्षत्रांचे देणे’ यांसारखे सादरीकरण यशस्वी ठरले आहेत. नुकताच प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांचीही सुरेल मैफील पार पडली. याच मालिकेत आता पापोन यांची मैफील ही पुणेकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या कार्यक्रमाची तिकिटे bookmyshow.com वर उपलब्ध आहेत.
‘पापोन - लाइव्ह इन कॉन्सर्ट’
कधी : २३ मे
केव्हा : सायंकाळी ७ वाजता
कुठे : पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.