

पुण्यात पावसाचा कहर! दत्तवाडीत घराच्या दरवाजावर विजेची तार तुटली; लेकीला वाचवायला गेलेली आईही गंभीर जखमी
पुणे : शहरात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसामुळे दत्तवाडी परिसरात घराच्या लोखंडी दरवाजावर महावितरणची तार तुटून पडल्याने, एका महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या आईलाही धक्का लागून त्या दूर फेकल्या गेल्या. या दोन्ही मायलेकींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.