कडूस आरोग्य केंद्रात 
विद्यार्थिनींना एचपीव्ही लस

कडूस आरोग्य केंद्रात विद्यार्थिनींना एचपीव्ही लस

Published on

कडूस, ता. १८ ः कडूस (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डायनॅमिक इंग्रजी माध्यम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधक लसीकरण व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १० विद्यार्थिनींना लस देण्यात आली.
कडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्हीबाबत लसीकरण व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद दौंडकर व डॉ. योगेश वरे यांनी विद्यार्थिनी व पालकांना एचपीव्ही विषाणू, याचे दुष्परिणाम व गर्भाशयाचा कर्करोग या विषयी मार्गदर्शन केले. छबी सेवा फाउंडेशनचे संचालक विश्वनाथ गारगोटे, आरोग्य कर्मचारी मारुती कौदरे, कल्पना मेंढे, सुचेता क्षीरसागर, विद्या रासकर, तेजस पाटील यांनी लसीकरण उपक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com