HPV Vaccine : ‘एचपीव्ही’चे महत्त्व काय? तुमच्या मुलींना गर्भाशय प्रतिबंधक लस दिलेली आहे का?

तुमच्या मुलींना गर्भाशय प्रतिबंधक लस दिलेली आहे का? नसेल तर ती नक्की द्या. कारण, त्यातून गर्भाशय मुखाचा कर्करोग निश्चित प्रतिबंधित करता येतो. त्यामुळे पालकांनो, तुमच्या मुलीला ‘एचपीव्ही’ प्रतिबंधक लस द्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
hpv
hpvsakal

पुणे : तुमच्या मुलींना गर्भाशय प्रतिबंधक लस दिलेली आहे का? नसेल तर ती नक्की द्या. कारण, त्यातून गर्भाशय मुखाचा कर्करोग निश्चित प्रतिबंधित करता येतो. त्यामुळे पालकांनो, तुमच्या मुलीला ‘एचपीव्ही’ प्रतिबंधक लस द्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये दुसरा सर्वांत सामान्य कर्करोग आहे. हा कर्करोग गर्भाशय मुखामध्ये होतो आणि तो ‘ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस’मुळे (एचपीव्ही) होतो.

hpv
HPV Vaccine for Cervical Cancer: 4 प्रकारच्या कॅन्सरचा 200 रुपयांचं Vaccine ठरणार वरदान! तज्ज्ञांनी केला खुलासा

या विषाणूंमुळे केवळ गर्भाशयाबरोबरच जननेद्रिंयाशी संबंधित कर्करोगदेखील होतो. ‘एचपीव्ही’ लसीकरणाबाबत सर्वसामान्यांमध्ये आजही पुरेशी जागरूकता दिसून येत नाही. लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधी पौगंडावस्थेत मुला-मुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरते. अगदी ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील प्रौढ देखील या लसीसाठी पात्र आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. प्रचार आणि साक्षरता मोहिमेच्या अभावी ‘एचपीव्ही लसीकरणाबाबत जागरूकता कमी होते.

सर्वसाधारणतः २७ ते ४५ वर्षे वयोगटात ही लस कमी प्रभावी आहे. या विषाणूंपासून होणाऱ्या कर्करोगांना प्रतिबंध करण्यासाठी त्याबाबत योग शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. नियमित तपासणी आणि लसीकरणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. तरुण स्त्रियांमध्ये वेळीच निदान आणि प्रतिबंध करण्याच्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी कुटुंब आणि समुदायांमध्ये लैंगिक आरोग्याविषयी चर्चेसाठी प्रोत्साहन आवश्यक आहे.

- डॉ. सुश्रुता मोकादम,

प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ, खराडी

असे होते लसीकरण

  • ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी दोन डोस द्यावेत

  • ते ६ महिन्याच्या अंतराने द्यावेत

  • वयाच्या १५ वर्षांपर्यंत आणि त्याहून अधिक वयोगटातील मुलींकरिता तीन डोस द्यावेत

‘एचपीव्ही’चे महत्त्व काय?

  • गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी ‘एचपीव्ही’ लस दिली जाते

  • प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला हा एकमेव कर्करोग आहे

  • ही लस केवळ वैयक्तिक संरक्षणापुरतीच नाही

  • व्यापक लसीकरणामुळे या संसर्गाविरोधात प्रतिकारशक्ती

  • निर्माण होऊ शकते

  • समुदायांमध्ये ‘एचपीव्हीचा’ प्रसार कमी होतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com