‘ऑल दि बेस्ट’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

मित्र-मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना ‘ऑल दि बेस्ट.’ परीक्षेचे अजिबात टेंशन घेऊ नका, शांत डोक्‍याने आणि एकाग्रतेने प्रश्‍नपत्रिका वाचा आणि मस्तपैकी उत्तरे लिहा. यश तुमचेच आहे. या शुभेच्छा देण्याचे निमित्त म्हणजे मंगळवारपासून (ता. १८) सुरू होणारी बारावीची परीक्षा. 

पुणे - मित्र-मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना ‘ऑल दि बेस्ट.’ परीक्षेचे अजिबात टेंशन घेऊ नका, शांत डोक्‍याने आणि एकाग्रतेने प्रश्‍नपत्रिका वाचा आणि मस्तपैकी उत्तरे लिहा. यश तुमचेच आहे. या शुभेच्छा देण्याचे निमित्त म्हणजे मंगळवारपासून (ता. १८) सुरू होणारी बारावीची परीक्षा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांतील ३ हजार ३६ केंद्रांवर ही परीक्षा होईल. यंदा १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा १८ मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेसाठी राज्यभरातील ९ हजार ९२३ कनिष्ठ महाविद्यालयातील ८ लाख ४३ हजार ५५२ विद्यार्थी तर ६ लाख ६१ हजार ३२५ विद्यार्थिनी, तर १५० तृतीयपंथी परीक्षा देणार आहेत. त्यात पुणे विभागातल्या पुणे, नगर, सोलापूरमधून २ लाख ९ हजार ४४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सचिव अशोक भोसले, शशिकांत चव्हाण उपस्थित होते. परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळातर्फे २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. 

केंद्रावर मोबाईल बंदी 
व्हॉट्‌सॲपवरून प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्‍यता असते. यावर प्रतिबंध आणण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही इलेक्‍ट्रॉनिक साधन, साधा किंवा स्मार्ट फोन घेऊन जाण्यास बंदी आहे. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांसह केंद्रसंचालक, परीक्षकांना परीक्षा काळात मोबाईल वापरण्यास बंदी आहे. या सर्वांचे मोबाईल जमा करून एका ठिकाणी ठेवले जाणार आहेत. याबाबत परीक्षा केंद्रचालकांना सक्त सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी मंडळाने हेल्पलाइन सुरू केल्या आहेत.

परीक्षा केंद्रावर अर्धातास आधी या
परीक्षा सकाळी ११ ते २ दुपारी आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन सत्रांत होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या  अर्धातास आधी परीक्षा केंद्रावर यावे. १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वाचन करण्यासाठी देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास उशीर होणार आहे. त्याचे कारण काय आहे, त्यावरून परीक्षा केंद्रचालक परीक्षा देऊ द्यायची की नाही? याचा निर्णय घेतील, असे डॉ. काळे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन - ७०३८७५२९७२
मुली  ५९,३५०
मुले ७२,८२२
विज्ञान   ५०,६०१
कला  २२,६३८
वाणिज्य  ५२,१८०
किमान कौशल्य ५,७५३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HSC Student All the best