
पुणे : राज्य परिवहन विभागाने वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) लावण्यासाठी दिलेल्या मुदतीत तिसऱ्यांदा वाढ केली आहे. पात्र वाहनांपैकी केवळ ३० टक्के वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसविण्यात आली आहे. वाहनधारकांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन विभागाने मुदतवाढ दिली. वाहनधारकांना १५ ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतवाढ ही शेवटची असून, आता पुन्हा मुदतीत वाढ होणार नसल्याचे परिवहन आयुक्तांनी सांगितले.