hsrp number plate
sakal
पुणे - पुण्यातील २४ लाखांहून अधिक वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावणे अनिवार्य आहे. मात्र, त्यापैकी सुमारे दहा लाख वाहनांनाच प्रत्यक्षात नंबर प्लेट लावली आहे. नोंदणी झालेली संख्या १० लाख १७ हजार ८०४ आहे, तर सुमारे १४ लाख वाहने अद्यापही नंबर प्लेटपासून दूर आहेत. बुधवारी (ता. ३१) नंबर प्लेटच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख आहे.