

Child death in car accident
sakal
पुणे : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या पाच वर्षीय मुलाचा भरधाव मोटारीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना लोणी काळभोर परिसरातील जॉय नेस्ट सोसायटीत सोमवारी (ता. १९) दुपारी घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.