भविष्यात पुणे रेल्वेचे हब : संभाजी पाटील-निलंगेकर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

पुणे : 'जर्मनीसह विविध देशांतील कंपन्या पुण्यात असून, कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या शहरात असून, औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे रेल्वे इंडस्ट्रीजचे हब होऊ शकेल,'' असे मत कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केले. 

पुणे : 'जर्मनीसह विविध देशांतील कंपन्या पुण्यात असून, कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या शहरात असून, औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे रेल्वे इंडस्ट्रीजचे हब होऊ शकेल,'' असे मत कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केले. 

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चरच्या वतीने (एमसीसीआयए) आयोजित केलेल्या रेल्वे व मेट्रोविषयक परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. रेल्वे बोर्डाचे संचालक राजेश अग्रवाल, एमसीसीआयएचे माजी अध्यक्ष रवी पंडित, प्रशांत गिरबाने, दीपक करंदीकर, "पीएमआरडीए'चे आयुक्त किरण गित्ते उपस्थित होते. 

निलंगेकर म्हणाले, "मेट्रो कोचेस तयार करण्याचा कारखाना लातूरला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक अधिक होत आहे. त्यासाठी पायाभूत सेवासुविधा उभारण्याची आवश्‍यकता आहे. "एमसीसीआयए'च्या माध्यमातून मेट्रो व रेल्वे क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकत्रित येण्याची संधी मिळाली आहे.'' 

अग्रवाल म्हणाले, "रेल्वे ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दररोज लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू रेल्वे आहे. म्हणूनच रेल्वेची क्रयशक्ती अधिकाधिक वाढविण्याची गरज आहे.'' पंडित म्हणाले, "कार्गो रेल्वे, रिंग रेल्वे, नाशिक रेल्वे सोबतची कनेक्‍टिव्हिटी आणि पुणे-लोणावळा दरम्यान लोहमार्गाच्या विस्तारीकरणाला या परिषदेमुळे चालना मिळेल.'' 

पुण्यात मेट्रोचे 72 किलोमीटरचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. भविष्याच्या दृष्टीने तळेगाव-चाकण-शिक्रापूर-दौंड तसेच शिक्रापूर ते नवीन 
विमानतळादरम्यान मेट्रो मार्गाचाही विचार होऊ शकतो. 
-किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The hub of Pune Railway in the future says Sambhaji Patil Nilangekar