esakal | रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; 3 फ्लॅट्स व 2 दुकानं भस्मसात
sakal

बोलून बातमी शोधा

. A huge fire at a building in Rasta Peth Pune 3 flats and 2 shops burnt down

आज पहाटे 3 वाजता ही आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच त्वरित अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत आग इमारतीत सर्वत्र पसरली होती.

रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; 3 फ्लॅट्स व 2 दुकानं भस्मसात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे :  रास्ता पेठेतील मद्रासी गणपतीजवळ एका इमारतीमध्ये आग लागण्याची घटना घडली. यात 3 फ्लॅट्स व 2 दुकाने या आगीत जळाली आहेत. तर एका कारचे देखील नुकसान झाले. आज पहाटे 3 वाजता ही आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच त्वरित अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत आग इमारतीत सर्वत्र पसरली होती.
 

अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांच्या साह्याने ही आग विझविण्यात आली. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, फ्लॅट्स आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. 
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image