कोरोनाची पहिली लस पुण्यात; 'मानवी चाचणी सुरू

Human test  for Corona first vaccine in Pune
Human test for Corona first vaccine in Pune
Updated on

पुणे: प्रत्येक भारतीय ज्याची उत्कंठतेने वाट पाहतोय त्या कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीची देशातील पहिली मानवी चाचणी बुधवारी पुण्यात झाली. देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही एतिहासिक घटना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये घडली. दुपारचा बरोबर एक वाजला होता. भारती हॉस्पिटलच्या तळ मजल्यावरील बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) एकच धावपळ सुरू होती. वॉर्ड बॉयपासून ते डॉक्टरांपर्यंत सगळ्यांमध्ये ओसंडून वाहणारा एक उत्साह दिसत होता. कारणही त्याचे तसेच होते. याच ठिकाणी कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करणारी देशातील पहिली मानवी चाचणी येथे होणार होती. त्याची वेळ जवळ आलेली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सकाळ’ने दिलेली बातमी राज्यभर व्हायरल झाली होती. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या मानवी चाचणीकडे लागले होते. लस कशी देणार, कोण देणार, कोणाला देणार, किती जणांना देणार असे एका मागोमग एक प्रश्न येथे उपस्थित असलेल्यांप्रमाणेच या बातमीकडे डोळे लावून बसलेल्यांना पडले होते. इतक्यात डॉक्टरांचे एक पथक पावले टाकत ‘ओपीडी’च्या दिशेने आले. त्यात वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी होते. त्यांच्या बरोबर डॉ. अस्मिता जगताप, डॉ. सोनाली पालकर, डॉ. जितेंद्र ओसवाल पुढे चालत येताना दिसले. त्यांच्याबरोबर अजून एक माणूस होता. पस्तीशीच्या दरम्यान वय होते. एका टेबलसमोर ठेवलेल्या खुर्चीत तो पस्तीशीचा माणूस बसला. तोच होता पहिला स्वयंसेवक. ‘आँक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अँस्टॅजेनेका’ आणि पुण्याची ‘सिरम इन्स्टिट्युट आँफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन  निर्माण केलेल्या ‘कोविशिल्ड’ ही कोरोना प्रतिबंधक पहिली लसी याला टोचली जाणार होती. या स्वयंसेवकाच्या शरीराचे तापमान बघीतले. त्याच्या रक्तदाबाची नोंद झाली. हृदयाचे ठोके मोजले. त्याची तपशिलवार नोंद कागदावर करण्यात आली. त्यानंतर या पहिल्या रुग्णाला डॉ. संजय ललवाणी यांनी लस दिली. पाठोपाठ याच पद्धतीने दुसऱया 48 वर्षीय पुरुषालाही लस टोचण्यात आली. त्या दोघांना डाव्या दंडात 0.5 मिलीलिटर इंजेक्शन देण्यात आले.

 
तंत्रज्ञानाच्या युगात यशस्वी व्हायचे असल्यास स्वतःला सिद्ध करा - अच्युत गोडबोले 

डॉ. ललवाणी म्हणाले, “कोविशिल्ड लस ही ‘आँक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ने शोधले आहे. ती ‘सिरम इन्स्टिट्युट आँफ इंडिया’ने उत्पादित केली आहे. लस निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील या चाचण्या आता सुरु झाल्या आहेत. दुसऱया टप्प्यात लसीची सुरक्षितता बघण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरात शंभर स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. या टप्प्याच्या निष्कर्षावर सरकारने मान्यता दिल्यानंतर तिसऱया टप्प्यातील मानवी चाचण्या सुमारे दीड हजार स्वयंसेवकांवर करण्यात येतील.”
पाचपैकी दोघांना दिली लस
मानवी चाचणीसाठी पाच जणांची निवड करण्यात आली होती. त्यात दोन स्त्रिया आणि तिन पुरुष होते. त्यांच्या काल वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. त्याचा रिपोर्ट आज आला. त्यात पाच पैकी तीन जणांचा अँटिबॉडी रिपोर्ट पॉझिटीव्ह होता. म्हणजे, त्यांना नकळत कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊन गेला होता. त्यामुळे पाचपैकी दोनच जणांवर कोविशिल्डची मानवी करण्यात आली, असे डॉ. ललवाणी यांनी स्पष्ट केले. 

अशी केली स्वयंसेवकांची निवड
-    वय 18 वर्षांपेक्षा जास्त
-    कोरोना निदान चाचणी निगेटिव्ह हवी 
-    कोरोनाच्या अँटिबॉडिस् निगोटिव्ह असावी
-    ताप, सर्दी, खोकला नसावा
-    न्यूमोनिया नको
-    लसीचे फायदे आणि तोटे स्वयंसेवकांना सांगितले.

पुढे काय होणार
-    सुरवातीला शंभर जणांवर ही लसीच्या सुरक्षिततेची चाचणी होणार. 
-    त्यानंतर याची खात्री झाल्यानंतर तिसऱया टप्प्यातीलम मानवी चाचणी सुरू होईल
-    लस दिल्यानंतर शरीरात किती प्रतिकारशक्ती (अँटिब़ॉडिस्) तयार होतात ते पाहिले जाईल
-    सुरक्षितता आणि प्रतिकारशक्ती या दोन्ही निकषांचा अभ्यास होणार
-    देशातील सर्व केंद्रातून या दोन्हीची माहिती संकलित होईल
.....
28 व्या दिवशी दुसरा डोस
लसीचा पहिला डोस दिल्यानंतर आजपासून 28व्या दिवशी दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर 56व्या ते हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी होईल. 90व्या त्यांची फोनवरून चौकशी केली जाईल आणि 180व्या दिवशी ते परत हॉस्पिटलमध्ये तपासण्यासाठी येतील. या दरम्यान त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत लागली तर त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यामुळेच रुग्णालयाच्या पाच किलोमीटर परिसरातील व्यक्तींनाच स्वयंसेवक म्हणून घेतले असल्याचेही डॉ. ललवाणी यांनी सांगितले. 
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com