
Pune Crime
Sakal
पुणे : ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून पश्चिम बंगालमधील तरुणींना पुण्यात आणत वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या दलालाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पश्चिम बंगालमधील दोन तरुणींची सुटका केली. तरुणींनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली.