घोरपडी - वानवडी मधील एसआरपीएफच्या अलंकार लॉनमध्ये मंगळवारी संध्याकाळी कवडे व गलांडे परिवारातील लग्नाची गडबड सुरू होती. आकर्षक फुलांनी आणि रंगीबिरंगी विद्युत रोषणाईने लॉन सजवण्यात आला होता. सगळे पाहुणेमंडळी जमा झाले होते. जेवणाच्या टेबलवर गर्दी सुरू झाली.