जावळीतील विजय हा परिवर्तनाची नांदी आमदार शशिकांत शिदे
महाआघाडीचे यश हे परिवर्तनाची नांदी
शशिकांत शिंदे; हुमगाव येथे सर्वपक्षीय विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा
हुमगाव, ता. १२ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जावळी तालुक्यात महाविकास आघाडीला मिळालेले यश हे आगामी काळातील परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
हुमगाव येथे आयोजित सर्वपक्षीय विजयी उमेदवारांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश कदम, सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, माथाडी नेते ऋषिकांत शिंदे, माजी सभापती मोहनराव शिंदे, नगरसेवक सौरभ शिंदे उपस्थित होते.
यावेळी श्री. शिंदे म्हणाले, ‘‘हा विजय आपल्या संघटनशक्तीचा आहे. ज्यांना यावेळेस अपयश आले, त्यांनी निराश न होता अधिक जोमाने संघटन मजबूत करावे, पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.’’ लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत भाग घेतलेल्या मतदारांचे त्यांनी आभार मानतानाच विजयी उमेदवारांनी जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक जबाबदारीने व बांधिलकीने काम करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिल्या.
यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्या कविता ओंबळे, पंचायत समिती सदस्य आतिश कदम, सुनीता दुंदळे, शिल्पा शिंदे व घणसोलीचे नगरसेवक सौरभ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अंकुश कदम, एकनाथ ओंबळे, विठ्ठलराव गोळे यांचीही भाषणे झाली. यावेळी सार्थक बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा वैशाली शिंदे, राष्ट्रवादीच्या राज्य उपाध्यक्षा समिंद्रा जाधव, जिल्हा उपाध्यक्षा रूपाली भिसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन गोळे, डॉ. मिलिंद शिंदे, धनवंती पवार, रवींद्र पार्टे, अर्चना निकम, संजय गाडे, सरिता शिंदे, समीर गोळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख अविनाश दुर्गावळे, गणेश निकम, सीताराम पवार, श्रीरंग गलगले व महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............................................
माझ्या पराभवाचा वचपा
कुसुंबी गटात पराभूत झालेल्या उमेदवार अर्चना रांजणे यांचे पती व जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यावर बोलण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी करताच आमदार शिंदेंनी रांजणे यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. काही लोकांना जिल्हा बँकेत माझा पराभव झाल्यावर त्यांचे हात आकाशाला टेकल्याचा भास होत होता. जन्म देणाऱ्या बापाला ते विसरले होते. मात्र, आता सामान्य कार्यकर्त्याने त्यांचा पराभव करून जिल्हा बँकेतील माझ्या पराभवाचा वचपा काढला, असे आमदार शिंदेंनी सांगितले.
............................................
फोटो :..........व्हॉट्सॲपवर
हुमगाव : नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना शशिकांत शिंदे. (भाऊसाहेब जंगम : सकाळ छायाचित्रसेवा)
............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

