
निरगुडसर(पुणे) : लघुपाटबंधारे विभागामधून निरगुडसर येथे घोडनदीवर ८३ लक्ष रुपये खर्च करुन तीन मीटर उंचीचा पाणी साठवण बंधारा उभारला जाणार असुन या बंधाऱ्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे निरगुडसर, जवळे, भराडी गावासह परीसरातील गावातील शेकडो एकरातील शेतीला या पाणीसाठवण बंधाऱ्याचा फायदा होणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
घोडनदीवर पारगाव बंधाऱ्यापासुन भराडी बंधाऱ्यापर्यंत एक पण पाणी साठवण बंधारा नसल्याने उन्हाळ्यात नदीपाञ कोरडे ठाक पडते त्याचा अधिक फटका निरगुडसर, जवळे, भराडी परिसरातील शेकडो एकरातील शेतीला बसतो, ही बाब लक्षात घेता लघुपाटबंधारे विभागामधून निरगुडसर येथे घोडनदीवर ८३ लक्ष रुपये खर्च करुन तीन मीटर उंचीचा पाणी साठवण बंधारा उभारला जाणार असुन या बंधाऱ्याच्या प्रसातावास मंजुरी मिळाली आहे. विशेष बाब म्हणून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नदी पुनरूज्जीवन अंतर्गत घोडनदीवर निरगुडसर साठवण बंधारा बांधण्याचे प्रस्तावास मंजुरी मिळाली असुन हे कामे वेळेत पूर्ण झाल्यास निरगुडसर, जवळे, भराडी गावासह परीसरातील गावातील शेकडो एकरातील शेतीला या पाणीसाठवण बंधाऱ्याचा फायदा होणार आहे.
शरद पवार संतापले; 'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, यावर कवडीचा विश्वास राहिला नाही!'
निरगुडसर येथे शुक्रवार (ता.०२) रोजी बंधाऱ्याच्या कामाचे भुमिपुजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, सरपंच उर्मिला वळसे पाटील, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, माजी उपसरपंच रामदास वळसे, संगिता हांडे, रामदास थोरात, बाळासाहेब येवले, आनंदराव वळसे, शरद वळसे, राहूल हांडे, युवराज हांडे, छोटे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता राजकुमार मुके, चेतन कोतकर उपस्थित होते
शेतकऱ्यांना जलसिंचनाचा होणार लाभ!
लघुपाटबंधारे विभाग मधून निरगुडसर येथील बंधारा तीन मीटर उंचीचा असून रक्कम रुपये ८३ लक्ष तसेच पारगाव येथील बंधारा दोन मीटर उंचीचा असुन रक्कम ४३ लक्ष इतका निधी टाकण्यात आला आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्यांना जलसिंचनाचा लाभ होणार आहे असल्याचे विवेक वळसे-पाटील यांनी सांगितले.
पुणेकरांनो, हॉटेलात जेवायला जाताय? मग 'अशा' प्रकारची काळजी घ्या!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.