Pune: स्वस्तात दुचाकी देतो म्हणून पुणे जिल्ह्यातील शेकडो आशा सेविकांची करोडोंची फसवणूक; तक्रार करुनही कारवाई होईना...

संघटनेच्या माध्यमातून विश्वास संपादन करुन सचिवानेच घातला गंडा.
Pune
PuneSakal

सिंहगड - स्वस्तात दुचाकी देतो असे खोटे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यातील शेकडो आशा सेविकांची करोडोंची फसवणूक करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे आशा सेविका व गट प्रवर्तक या नावाने संघटना सुरू करुन त्यामाध्यमातून आशा सेविकांचा विश्वास संपादन करुन सचिव म्हणून काम करणाऱ्या श्रीमंत बाबूराव घोडके याने ही फसवणूक केली आहे. याबाबत चार महिन्यांपूर्वी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

अगोदरच अत्यल्प व अवेळी मिळणाऱ्या मानधनावर काम करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील आशा सेविकांचा श्रीमंत घोडके याने आशा सेविका व गट प्रवर्तक ही संघटना सुरू करुन विश्वास संपादन केला.पुणे जिल्हा व तालुका स्तरावर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करुन संघटनेचे जाळे पसरविले.

Pune
Mumbai: राज्‍यभरात लवकरच दोन हजार ग्रंथालये; शिक्षण मंत्री दीपक केसरकर

2021 च्या जानेवारी महिन्यात घोडके याने पुणे जिल्ह्यातील सर्व आशा सेविकांना स्वस्तात दुचाकी मिळणार असून त्यासाठी लवकरात लवकर पैसे जमा करणारांनाच हा लाभ मिळणार असल्याची बतावणी केली. यासाठी खडकवासला येथील 14 आशा सेविकांनी प्रत्येकी 26500, वेल्हे तालुक्यातील 25 आशा सेविकांनी प्रत्येकी 16500 असे पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील आशा सेविकांनी कमी अधिक प्रमाणात घोडके याच्याकडे पैसे जमा केले.

हा एकूण आकडा चार ते पाच कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आशा सेविकांकडून सांगण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून आशा सेविका दुचाकी कधी मिळणार अशी विचारणा घोडकेकडे करत आहेत मात्र तो सातत्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करत आहे. याबाबत वेल्हे तालुक्यातील आशा सेविकांनी चार महिन्यांपूर्वी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र अद्याप कारवाई झाली नसल्याने अंगणवाडी सेविका संताप व्यक्त करत आहेत.

Pune
Pune : सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर मध्यप्रदेशातील, 'या' विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

"संघटनेचा पदाधिकारी असल्याने आमचा विश्वास बसला. जवळ पैसे नसताना दुसऱ्यांकडून पैसे घेऊन आम्ही घोडके याला पैसे दिले. अनेक वेळा दुचाकी कधी मिळणार अशी विचारणा केली परंतु तो सातत्याने उडवाउडवीची उत्तरे देत आहे. चार महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज दिलेला असून अद्याप कारवाई झालेली नाही." सपना राऊत, आशा सेविका, वेल्हे.

"घोडके याने मला केवळ नाममात्र अध्यक्ष केले होते. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र,बॅंक खाते याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. दुचाकीसाठी पैसे गोळा करण्याचे सांगितल्यानंतर मी त्याला नकार दिला होता व फसवणूक होण्याची शक्यता असल्याने इतर आशा सेविकांनाही पैसे देऊ नका असे सांगितले होते. तरिही त्याच्या आमिषाला बळी पडून शेकडो गोरगरीब आशा सेविकांनी पैसे दिले. घोडके याच्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात यावी."

स्वाती धायगुडे, आशा सेविका,बारामती.

"संबंधित व्यक्ती पैसे देतो असे म्हटल्याने कारवाई करु नका असे आशा सेविकांनीच सांगितले होते. त्यामुळे आम्ही थांबलो होतो. आम्ही कारवाई करत असून वरिष्ठांचे म्हणणे घेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे."

रणजित पठारे, प्रभारी अधिकारी, वेल्हे पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com