लग्नात (Marriage) व्यवस्थित मानपान दिला नाही, फ्लॅटसाठी आई वडिलांकडून ३ लाख रुपये आणले नाहीत, म्हणून पतीसह सासरची मंडळी वारंवार त्यांना टोचून बोलून मारहाण करत.
उरुळी कांचन : माहेरहून फ्लॅटसाठी तीन लाख रुपये आणावेत, म्हणून विवाहितेचा (Married Woman) मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पती, सासू व सासऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.