Crime
sakal
उरुळी कांचन - शिवीगाळ का केली? असे विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर आणि त्याच्या भावावर चाकू हल्ला झाल्याची घटना उरुळी कांचन येथील गोळे वस्ती परिसरात घडली, याप्रकरणी पती-पत्नी विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल लक्ष्मण झोंबाडे (वय-३९ रा. गोळे वस्ती, उरुळी कांचन) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.