पत्नीच्या प्रियकराचा खून

पत्नीच्या प्रियकराचा खून
Published on

पत्नीच्या प्रियकराचा खून;
पतीस उच्च न्यायालयातून जामीन
सोलापूर, ता. १५ : मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील सागर मनोहर इंगोले यांच्या खूनप्रकरणी आरोपी सुभाष श्रीमंत होनमुके (रा. मुरळी, ता. मंगळवेढा) यास उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झाला आहे.
सागर मोबाईल शॉपी चालवत होता. सुभाषची पत्नी मोबाईल रिचार्जसाठी त्याच्याकडे येत होती. त्यातून दोघांचे प्रेमसंबंध जुळल्याचा आरोप आहे. २५ एप्रिल २०२५ रोजी सागर घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी तो सुभाषच्या वस्तीवर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती त्याचे वडील मनोहर इंगोले यांना मिळाली. ते अन्य लोकांसह तेथे गेले असता सागरचा मृत्यू झाल्याचे आढळले. त्याच्या सर्वांगावर जखमा होत्या. याबाबत मनोहर इंगोले यांनी मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार सुभाषला अटक केली.
सुभाषने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पंढरपूर सत्र न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत त्याने जामिनासाठी अर्ज केला. सुनावणीवेळी पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी ही घटना पूर्वनियोजित नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुभाषचा जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे व ॲड. महादेव गायकवाड यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Harshad Hundaleker murder case latest news
Mahmad Khalif murder Nipani
Main accused in toxic liquor case arrested after a dramatic chase.
Daund Beheading Case: दौंडमध्ये ७० वर्षीय महिलेचा शिरच्छेद करून खून; दोन संशयित अटकेत, शिराचा शोध सुरू
Marathi News Esakal
www.esakal.com