

दहा लाखांसाठी पत्नीस घराबाहेर काढले
सोलापूर : नवीन घर घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी पतीने पत्नीस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत घरातून हाकलून दिल्याची घटना वसंत नगर पोलिस लाइन येथे घडली. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात विशाल अंबादास बनसोडे (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी तेजस्विनी विशाल बनसोडे (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन मुली झाल्यानंतर मुलगा झाला नाही म्हणून विशाल हा त्रास देत होता. त्याला दारूचे व्यसन असून तो वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
---
अवंती नगरात तरुणास पाइपने मारहाण
सोलापूर : दुचाकी बंद पडल्याने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या तरुणास तिघांनी लोखंडी पाइप व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना अवंती नगरातील अरविंद धाम पोलिस वसाहतीसमोर घडली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अजय देवराम पाडवी व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अनुराग महेश मोरे (वय २३) हे दुचाकी बंद पडल्याने ती पाहत उभे असताना आरोपींनी ‘तू येथे का उभा आहेस’ अशी विचारणा करत शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी पाइप, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.