जाचकवस्ती येथे पती-पत्नीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

Walchandnagar Crime : जाचकवस्ती येथे पती-पत्नीची आत्महत्या

वालचंदनगर - जाचकवस्ती (ता. इंदापूर) जवळील ३९ फाटा येथे पती-पत्नीने एक दिवसाच्या फरकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून पती-पत्नीच्या मृत्यमुळे इंदापूर तालुक्यावरती शोककळा पसरली आहे.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जाचकवस्ती जवळील ३९ फाटा येथे शेख कुंटूब राहत आहे. रेश्मा आयुब शेख (वय ३०) या महिलेने पती व सासू कडून मानसिक व शारीरिक त्रासाच्या कारणावरुन गुरुवारी (ता. २) रात्री विषारी औषध घेतले.तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

रेश्‍माच्या मृत्यूनंतर रेश्‍माची आई रशिदा सैफन शेख (रा. आसु, ता. फलटण जि.सातारा) यांनी पती आयुब शेख व सासू बाळी शेख यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. रेश्‍माचा पती आयुब बाशा शेख (वय, ३५ रा. जाचकवस्ती) यांना सासूने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिल्यानंतर आयुब शेख यांनी ही खाराओढा येथे शुक्रवारी (ता.३) रोजी ओढ्यानजीक गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. पती-पत्नीच्या मृत्यूमुळे इंदापूर तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे.

टॅग्स :punecrimewife and husband