घटस्फोट देत नाही म्हणून पतीचा पत्नीला घराबाहेर काढण्याचा कट

husbands wife plans to move out of the house because she rejects divorce.jpg
husbands wife plans to move out of the house because she rejects divorce.jpg
Updated on

पुणे : लग्न झाल्यानंतर दोन मुले असताना घटस्फोट मिळावा म्हणून पतीने दाखल केलेला दावा येथील कौटुंबिक न्यायालयाने फेटाळला आहे. दाव्यासह पतीने केलेल्या अवास्तव मागण्याही न्यायालयाने नामंजूर करीत पतीला झटका दिला आहे.

काही केल्या पत्नी घटस्फोट देत नाही. तसेच ती आपल्या धमक्‍यांनाही भीक घातल नाही म्हणून पतीने पत्नी रहात असलेल्या घरात मालक म्हणून घोषत करावे, पत्नीला राहत्या घरात येण्यास मनाई करावी, मुलांचा बेकायदेशीर द्यावा आणि मुलांच्या पोषणासाठी पत्नीकडून पोटगी मिळावी, असे अर्ज दाव्यादरम्यान पत्नीन केले होते. मात्र पत्नीची बाजू विचारत घेऊन न्यायालयाने हे सर्व अर्ज फेटाळले. पुनम आणि प्रतिक (नावे बदललेली) यांचे 1998 साली लग्न झाले होते. दोन मुलांच्या जन्मानंतर 2007 पासून त्यांच्यामध्ये टोकाचे वाद होवू लागले. त्यामुळे ते स्वंतत्र राहत होते. वाद टोकाला गेल्याने प्रतिकने पुनमपासून घटस्फोट मिळावा म्हणून 2012 साली येथील कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे पत्नीने पोटगीचा अर्ज केला होता. न्यायालयाने त्यावेळी पुनम यांना दरमहा पाच हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.

पुनम यांचा घटस्फोट देण्याला ठाम विरोध होता. त्यामुळे प्रतिक यांनी पुनम यांना विविध प्रकारे धमकाविण्यास सुरुवात केली. मात्र त्या घाबरत नसल्याचे लक्षात येताच प्रतिक यांनी दावा सुरू असताना विविध प्रकारचे अर्ज न्यायालयात दाखल करीत पुनम यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. 8 वर्ष हा दावा न्यायालयात सुरू होता. पुनम या दोन्ही मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते. पुनम सध्या फ्लॅटचे हप्ते भरत असल्याची बाब पुमन यांच्या वकील मिनाक्षी डिंबळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे न्यायालयाने प्रतिक यांचा घटस्फोटाचा दावा आणि इतर सर्व अर्ज फेटाळून लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com