आसू - मुधोजी महाविद्यालयात ''आई माझ्या कॉलेजात'' हा नाविन्यपूर्ण उपक्रम

आसू - मुधोजी महाविद्यालयात ''आई माझ्या कॉलेजात'' हा नाविन्यपूर्ण उपक्रम

Published on

मुधोजी महाविद्यालयात ‘आई माझ्या कॉलेजात’

फलटणमध्ये आजी- माजी विद्यार्थी- माता यांच्या संयुक्त मेळाव्यास प्रतिसाद

आसू, ता. २२ : माजी विद्यार्थी समिती आणि आयक्यूएसीच्या संयुक्त विद्यमाने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात ‘आई माझ्या कॉलेजात’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम उत्साहात झाला. आजी- माजी विद्यार्थी आणि त्यांच्या माता अशा संयुक्त मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲड. अभिजित मोहिते आणि वन अधिकारी स्नेहा गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम होते. स्नेहा गवळी यांनी आपल्या एकंदर जीवनातील वाटचालीचा आढावा घेताना त्या म्हणाल्या, ‘‘एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षेतील यश हे अग्निदिव्यच असते. त्यासाठी मोठा त्याग आणि संघर्ष करावा लागतो.’’
यशाने हुलकावणी दिली, तरी हार न मानता अभ्यासात सातत्य राखले पाहिजे. प्लॅन बी सुद्धा तयार असला पाहिजे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश मिळतेच, असाही विश्वास त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना दिला, तसेच त्यांच्या यशामध्ये आई-वडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
ॲड. अभिजित मोहिते म्हणाले, ‘‘या उपक्रमामुळे पालक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद निर्माण होईलच. याशिवाय मातांना सन्मान दिल्याने आपल्या पाल्यांप्रती त्यांचे ऊर अभिमानाने भरून येईल, यात शंका नाही. विद्यार्थ्यांनी आईसाठी का होईना काहीतरी करावे. सन्मार्गाने जाऊन चांगले यश संपादन करावे.’’
मातांच्या प्रतिनिधी म्हणून साधना कदम यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने आई माझ्या कॉलेजात या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्राचार्य डॉ. कदम यांनी सांगितले.
कला शाखाप्रमुख डॉ. अशोक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष डॉ. नवनाथ रासकर यांनी आभार मानले. धनश्री जगताप, वैष्णवी पवार, पायल जाधव या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. यावेळी आजी-माजी विद्यार्थी, माता- पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------
02537
फलटण : ‘आई माझ्या कॉलेजात’ या उपक्रमात मार्गदर्शन करताना ॲड. अभिजित मोहिते. त्या वेळी स्नेहा गवळी, पी. एच. कदम आदी.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com