esakal | Pune :...तर मी पोलिस अधिकारी झालो नसतो
sakal

बोलून बातमी शोधा

post man

Pune :...तर मी पोलिस अधिकारी झालो नसतो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता : "त्यावेळचे पोस्टमन काका शासनाकडून आलेले पत्र देण्यासाठी सलग पाच दिवस चार मजले चढून माझ्या घरी येत होते. परंतु घरात कोणी नसल्यासने अखेर सहाव्या दिवशी आमची भेट झाली आणि ते पत्र मला मिळाले. आणखीन थोडा उशीर झाला असता तर मला परीक्षा देता आली नसती. त्यांच्यामुळे आज मी पोलिस अधिकारी झालो आहे. त्या पोस्टमन काकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत," अशा शब्दात एका पोलीस अधिकाऱ्याने टपाल विभागाप्रति असलेली आपली कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा: Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

जागतिक टपाल दिनानिमित्त सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी हिंगणे येथील टपाल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला. त्यावेळी त्यांनी आपल्या 'या आठवणी' सांगितल्या. जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी "डाकिया डाक लाया खुशी का संदेश लाया" हे गाणे वाजवून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले.

हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या घरावर मुंबई पोलिसांची नोटीस

पोलीस दलाकडून टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा झालेला हृद्य सत्कार आमची प्रेरणा वाढवणारा आहे, असे मत हिंगणे येथील टपाल विभागातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी टपाल विभागाच्या वतीने पोस्टमास्तर सुचेता सोनवणे, राजेंद्र इंगुळकर, सिद्धार्थ खामकर, संजय नडे, राजीव तेलंगी, प्रिया कुलकर्णी, प्रज्ञा जोगदेव आदी कर्मचारी उपस्थित होते. तर सिंहगड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्यासह प्रशांत काकडे, विश्‍वनाथ कदम, मयूर शिंदे, श्रीधर पाटील, आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top