IAS Exam : ‘आयएएस’ची जिद्द मानसी काही सोडेना! केंदूरच्या तरुणीचे चढत्या रॅंकने तिसऱ्यांदा यूपीएससीत यश
यूपीएससी परीक्षेत केंदूरच्या डॉ. मानसी रंजना नानाभाऊ साकोरे हिने सलग तीन वेळा यश मिळविले असून, यावेळी तिने ४५४ रॅंक घेऊन यूपीएससीची हॅट्ट्रिक केली आहे.
केंदूर (ता. शिरूर) : डॉ. मानसी साकोरे (उजवीकडून पहिली) व तिची बहीण डॉ. दीपिका, भाऊ डॉ. जय, वडील नानाभाऊ व आई रंजना साकोरे.
sakal
शिक्रापूर - देशात सर्वात अवघड समजली जाणारी प्रशासकीय सेवेची परीक्षा म्हणजे यूपीएससी. या परीक्षेत केंदूरच्या डॉ. मानसी रंजना नानाभाऊ साकोरे हिने सलग तीन वेळा यश मिळविले असून, यावेळी तिने ४५४ रॅंक घेऊन यूपीएससीची हॅट्ट्रिक केली आहे.