साडे पाच महिन्यांतच पुणे पालिकेत आले नवे आयुक्त; विक्रम कुमार यांनी पदभार स्वीकारला 

ज्ञानेश सावंत 
रविवार, 12 जुलै 2020

सध्याचे साखर आयुक्त सौरभ राव यांची विभागीय आयुक्त आयुक्त कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. दीपक म्हैसेकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार राव यांच्याकडे येण्याची शक्याता वर्तविण्यात येत आहे. 

पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली झाली असून, त्यांच्याजागी आता ‘पीएमआरडीए’चे आयुक्त विक्रम कुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. नवे आयुक्त कुमार हे सोमवारी पदभार स्वीकारणार आहते. गायकवाड यांच्याकडे पुन्हा साखर आयुक्तपदाचीच सूत्रे देण्यात आली आहे. जेमतेम साडेपाच-सहा महिन्यांतच गायकवाड यांची बदली झाल्याने आश्चार्य व्यक्त होत आहे. लॉकडाऊन आणि त्यातून निर्बंध लादण्याला गायकवाडांचा विरोध असल्याने तडकाफडकी बदलले असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे गायकवाड यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या झाल्याने संपूर्ण प्रशासन हवालदिल झाले आहे. 

आणखी वाचा - पृथ्वीराज जाचकांची घरवापसी होणार, वाचा सविस्तर बातमी

दरम्यान, सध्याचे साखर आयुक्त सौरभ राव यांची विभागीय आयुक्त आयुक्त कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. दीपक म्हैसेकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार राव यांच्याकडे येण्याची शक्याता वर्तविण्यात येत आहे. 
गायकवाड यांची जानेवारीत महापालिका आयुक्तपदावर बदली झाली होती. त्यानंतर मार्चपासून ते कोरोनाविरोधातील मोहिमेत उतरले होते. पुण्यात कोरोना पसरण्याच्या शक्यातेने गायकवाड यांच्यासह साऱ्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना आखल्या. त्यानंतरच्या लॉकडाउनमध्ये मात्र लोकांसाठी कठोर निर्बंध न लादता काही सवलती देण्याबाबत गायकवाड हे सकारात्मक होते. त्याचवेळी राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना मात्र गायकवाड यांची भूमिका पटत नव्हती; तरीही धाडसाने काही निर्णय घेत गायकवाड यांनी पुणेकरांना दिलासा आहे. लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यांत मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू करण्यासाठीही गायकवाडांचा पुढाकार होता. त्यानंतर मात्र, गायकवाड हे राजकीयदृष्ट्या चर्चेत आले. येत्या सोमवारपासून नव्याने लादण्यात येणाऱ्या लॉकडाउनलाही गायकवाडांचा विरोध होता. या भूमिकांमुळे गायकवाड यांच्या बदलीची चर्चा होती. या पार्श्वयभूमीवर गायकवाड यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, कोरोनाची स्थिती हाताळण्यात काही अधिकारी कमी पडत असल्याने त्यांच्या बदलीची शिफारस करण्यात येत असल्याचे केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी कुणाल कुमार यांनीही सांगितले होते. महापालिकेतील उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यंता वर्तविण्यात येत आहे. त्यात मुठे यांना पदोन्नती मिळाल्याने ते आता अतिरिक्त जिल्हाधिकारी झाले आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वयभूमीवर मुठे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची बदली होणार नसल्याचे सरकारमधील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ias vikram kumar takes charge commissioner pune municipal corporation