‘भविष्यासाठी सज्ज सीए’ विषयावर ३ व ४ जूनला परिषद

‘आयसीएआय’तर्फे होणार विभागीय परिषद
ICAI regional conference CA 3rd and 4th June pune
ICAI regional conference CA 3rd and 4th June puneesakal

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलतर्फे (डब्ल्यूआयआरसी) दोन दिवसीय ३६ वी विभागीय परिषद ३ ते ४ जून दरम्यान बाणेर येथील बनतारा भवन येथे आयोजित केली आहे. ‘भविष्यासाठी सज्ज सीए’ संकल्पनेवरील या परिषदेचे उद्‌घाटन ३ जून रोजी ‘पर्सिस्टंट सिस्टीम्स’चे संस्थापक व मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे, ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए देबाशिष मिश्रा, उपाध्यक्ष अनिकेत तलाठी, माजी अध्यक्ष अमरजित चोप्रा यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ‘डब्ल्यूआयआरसी'चे अध्यक्ष व सनदी लेखापाल मुर्तुझा काचवाला यांनी दिली.

यावेळी ‘डब्ल्यूआयआरसी’च्या सचिव श्वेता जैन, विभागीय समिती सदस्या ऋता चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष राजेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. काचवाला म्हणाले,‘‘पुण्यात पहिल्यांदाच ही विभागीय परिषद होत आहे. परिषदेत सद्यःस्थितीत जागतिक स्तरावर भारताला असलेल्या संधी’ विषयावर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. अजित रानडे मार्गदर्शन करणार आहेत. ‘भविष्यासाठी आपण सज्ज आहोत का?’ आणि ‘चौकटीबाहेरचा विचार : संधींचे भांडार’ विषयावर चर्चासत्र होणार आहेत. उद्योग व सनदी लेखापाल क्षेत्रातील तज्ञ विचार मांडणार आहेत.’’

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘कर प्रणाली’, ‘जीएसटीमध्ये काय करावे व करू नये’, ‘देशातील बदलते प्रशासन’ यावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘भागीदारांच्या अपेक्षा आणि सीएंची भूमिका’ व सद्यःस्थितीतील भांडवली बाजार’ विषयांवर चर्चासत्र होणार आहेत.’’ परिषदेनिमित्त सनदी लेखापाल क्षेत्रातील नवतंत्रज्ञान, विविध प्रणाली, त्याचे स्वरूप यावर प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com