

‘आयसीएए’च्या अध्यक्षपदी मुलाणी
सातारा शाखेची नूतन कार्यकारिणीची स्थापना
उंब्रज, ता. ३ : सातारा येथील द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया अंतर्गत सातारा शाखेची नवी कार्यकारिणी स्थापन झाली. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या शपथविधीवेळी जोहेब मुलाणी यांनी अध्यक्षपदाची शपथ घेत शाखेच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारली.
यावेळी नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुमीत कदम, सचिवपदी स्वप्नील भोसले, तर कोषाध्यक्षपदी मंगेश प्रधान यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदी तानाजीराव जाधव, निखिल ओसवाल काम पाहणार आहेत.
सूत्रे स्वीकारल्यावर अध्यक्ष मुलाणी यांनी शाखेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, सदस्य व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी तसेच नावीन्यपूर्ण शैक्षणिक व व्यावसायिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी जीवन जगताप, रामदास कामटे, विजयकुमार भिसेगावकर, अतुल दोशी, निखिल राऊत, योगेश साखुंदे, ओंकार तिवरे, सौरभ लाहोटी, शाखेतील इतर चार्टर्ड अकाउंटंट सदस्यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून शाखा व्यावसायिक उत्कृष्टता, संघटनात्मक बळकटी आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास सदस्य उपस्थित होते.
-------
B00800
सातारा ः निवडीप्रसंगी जोहेब मुलाणी, सुमीत कदम, स्वप्नील भोसले, मंगेश प्रधान, तानाजीराव जाधव व निखिल ओसवाल.
......................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.