‘आयसीयू’तील महिला रुग्णाचा विनयभंग

‘आयसीयू’तील महिला रुग्णाचा विनयभंग
Published on: 

‘आयसीयू’तील महिला रुग्णाचा विनयभंग

हैदराबाद रोडवरील यशोधरा हॉस्पिटलमधील प्रकार; संशयित फरार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : हैदराबाद रोडवरील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल एका महिलेचा रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडितेच्या फिर्यादीवरून विशाल कांबळे नावाच्या त्या कर्मचाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
घरात असताना फिनेल प्राशन केलेल्या विजापूर येथील महिलेला कुटुंबियांनी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. महिलेवर रुग्णालयातील ‘आयसीयू’मध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी (ता. ६) मध्यरात्री साडेबारानंतर त्या वॉर्डात कोणी नसल्याची संधी साधून सफाईच्या बहाण्याने तो कर्मचारी पीडितेच्या रुममध्ये गेला. महिला झोपेत असल्याची संधी साधून त्याने विनयभंग केला. महिलेच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची माहिती सुधीर बहिरवाडे यांना दिली. त्यांनी लगेच हॉस्पिटल गाठले आणि तो पुरुष कर्मचारी महिलेच्या रुममध्ये गेलाच कसा, असा जाब प्रशासनाला विचारला. पोलिसांनीही हॉस्पिटल प्रशासनाचीच चूक असल्याचे म्हटले आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, तो सफाई कर्मचारी मोबाईल बंद करून पसार झाला आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख अल्फाज शेख यांचे पथक संशयिताचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com