रोगाच्या निदानाची ‘नाडी’ ओळखा!

भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्र असलेल्या आयुर्वेदातील नाडी परीक्षा हे शास्त्र आहे. त्यातून अनेक व्याधींचे अचूक रोगनिदान होतेच, पण रुग्णाला भविष्यात होणाऱ्या दुर्धर आजारांचा अंदाजही बांधता येतो.
Disease
DiseaseSakal
Updated on
Summary

भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्र असलेल्या आयुर्वेदातील नाडी परीक्षा हे शास्त्र आहे. त्यातून अनेक व्याधींचे अचूक रोगनिदान होतेच, पण रुग्णाला भविष्यात होणाऱ्या दुर्धर आजारांचा अंदाजही बांधता येतो.

पुणे - भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्र असलेल्या आयुर्वेदातील (Ayurved) नाडी (Pulse) परीक्षा (Exam) हे शास्त्र आहे. त्यातून अनेक व्याधींचे अचूक रोगनिदान होतेच, पण रुग्णाला भविष्यात होणाऱ्या दुर्धर आजारांचा (Disease) अंदाजही बांधता येतो. त्यामुळे जीवनशैलीमध्ये बदल करून संभाव्य आजारांना प्रतिबंध करणे शक्य होऊ शकते, असा विश्वास आयुर्वेदिक तज्ज्ञांनी व्यक्त केला. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपल्या देशातील वैद्यकशास्त्राच्या नाडी परीक्षणाची माहिती यातील तज्ज्ञांनी दिली. आयुर्वेदानुसार उत्तम चिकित्सेसाठी अचूक रोगनिदान आवश्यक असते.

नाडी परीक्षणाचे महत्त्व काय?

  • रुग्णाची पचन शक्ती, त्याचे बल, प्रकृती अशा आयुर्वेदातील ‘योगरत्नाकर’ या ग्रंथात रोगी शरीराचे परीक्षण करण्यासाठी आठ साधनांचे सविस्तर वर्णन आहे.

  • रुग्णाची नाडी, मूत्र, मल, जीभ, शब्द, स्पर्श दृष्टी आणि आकृती यांचा वापर करून रुग्णाच्या शरीरातील बदल नोंदविण्यात येतात. त्या आधारावर रोग निदान करता येते.

याचा फायदा काय?

या प्राचीन शास्त्राचा वापर आजच्या आधुनिक युगातही केला जातो व त्याद्वारे रूग्णचिकिसाही अचूक केली जाते. शरीराचा सुक्ष्म अभ्यास नाडीपरीक्षेमुळे होतो व रुग्णांना त्याचा अधिकाधिक फायदा देता येतो.

कशी होते तपासणी?

  • शरीरात हृदयाच्या ठिकाणी उगम पावणाऱ्या या नाड्या सर्व शरीरात रक्तप्रवाहाबरोबर प्राणवायूचेही संचरण करतात व शरीरातील याच गतीचा अभ्यास या नाडीशास्त्रात केला जातो.

  • नाडीपरीक्षेमध्ये मनगटावरील रक्तवाहीनीवर तर्जनी, मध्यमा व अनामिका या बोटांचा वापर करून शरीरातील दोष, धातू, अवयव, हृदय मस्तिष्क या या सारखे अवयव, मानसिक अवस्था, मणक्यांतील स्थित्यंतरे. यासारख्या विविध घटकांचा व्यापक व अचूक निदानासाठी उपयोग करता येतो.

  • मनगटाशिवाय गळा, पायाचा घोटा, कानाच्या जवळील नाडींचाही वापर काहीवेळा केला जातो.

  • साधारणतः वाताची नाडी विषम, पित्ताची नाडी उत्कट व कफाची नाडी मंद गतीची असते.

  • स्पर्शाला जागवणाऱ्या नाडीची गती, स्फूर्ती, तीव्रता, उष्मा, ठोके यावरून अतिशय बारकाईने शरीराची स्थिती व त्यात उत्पन्न झालेले दोष व त्यातील विषमता ओळखता येतात.

  • यामध्ये स्वस्थ असलेल्या व्यक्तिची वा आजारी माणसाच्या नाडीतील विविध स्पष्टपणे जाणवते. अजीर्ण, मुरलेला ताप, शरीरक्षय, हृदयरोग यासारख्या अवस्थांची नाडी लगेच ओळखता येते.

  • शिवाय पूर्वी घडलेले आघात या मुळे होऊ शकणाऱ्या व्याधीचाही काही प्रमाणात अंदाज बांधता येतो.

वारसा जपणारी अकरावी पिढी

पुण्यात वेगवेगळ्या प्रकारची घराणी आहेत. त्यात संगीत, वैद्यकीय, व्यावसायिक, उद्योजक, लष्करी सेवा अशांचा समावेश असतो. तसेच, नाडी परीक्षा करणाऱ्यांमध्ये सरदेशमुख असे घराणे आहे. त्यांची अकरावी पिढी सध्या नाडीपरीक्षा करते. यात वृद्धवैद्य परंपरेनुसार या पिढीजात आयुर्वेदाचा वारसा असणारे वैद्य सरदेशमुख कुटुंबाचे नाव अग्रेसर आहे. सरदेशमुख कुटुंबातील अकरावी पिढी आजही या नाडीपरीक्षेचा वापर व्याधींच्या अचूक निदानासाठी करीत आहेत. वैद्य सदानंद सरदेशमुख यांचे पिता परमपूज्य श्री प्रभाकर सरदेशमुख महाराज यांचा वेद, आयुर्वेद, अश्वायुर्वेद, वृक्षायुर्वेद यावर प्रभुत्व तर होतेच परंतु नाडी परिक्षेत हातखंडा होता. शरीराबरोबरच मानस विकार ही अचूक निदान करायचे. सध्या वैद्य स. प्र. सरदेशमुख हृदयरोग, मणक्याचे विकार, मधुमेह, करार, यासारख्या दुर्धर आजाराचे यथायोग्य परीक्षण नाडीपरीक्षेद्वारा करतात. त्यांचे सुपुत्र वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनाही ही विद्या परपरेनुसार अवगत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com