esakal | एसी असेल बंद, तर कोरोनाला पायबंद!
sakal

बोलून बातमी शोधा

AC

रुग्णवाहिकांची जबाबदारी बकोरियांकडे
रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही म्हणून रविवारी एका महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी शासकीय रुग्णवाहिका वेळेवर येत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, असा मुद्दा मांडला. त्यावर डॉ. म्हैसेकर यांनी राज्याच्या क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला.

एसी असेल बंद, तर कोरोनाला पायबंद!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्यासाठी वातानुकूल यंत्रणा (एसी) कारणीभूत ठरत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायला हवे, असे विधान परिषदेतील आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या निदर्शनास सोमवारी आणले. तसेच, महापालिकेत एसी वापरू नका म्हणून डॉ. गोऱ्हे यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशीही संपर्क साधला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी एसीबाबत सूचना केली. खासदार सुप्रिया सुळे, गिरीश बापट, वंदना चव्हाण आणि चेतन तुपे या बैठकीत सहभागी झाले होते. पुण्याचे महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेत्या तसेच काही नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी, एसीबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. सुळे यांनी प्रत्येक बैठकीला लोकप्रतिनिधींना उपस्थित राहता येत नाही. त्यासाठी त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स, गुगल मीट किंवा हॅंग आऊटद्वारे सहभागी करून घेता येईल, असे स्पष्ट केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, रुग्णवाहिका वेळेवर येत नाहीत, आदी मुद्दे बापट यांनी मांडले. संसर्ग झालेल्या नागरिकांना कोणत्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला द्यायचा, हे समजत नाही. त्यातून नागरिकांची फरफट होत असल्याचा मुद्दा डॉ. गोऱ्हे, तुपे यांनी मांडला. त्यावर डॉ. म्हैसेकर यांनी रुग्णालयांतील रुग्णसंख्या, उपलब्ध बेड यांची माहिती असलेला तक्ता सर्व लोकप्रतिनिधींना व्हॉट्‌सॲपवर पाठविला जाईल, याची ग्वाही दिली.
क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्ण पोचल्यावर त्याला कशा पद्धतीने माहिती द्यायची, यासाठी व्हिडिओ क्‍लिप तयार करा, अशी सूचना चव्हाण यांनी केली. त्याबाबत अंमलबजावणीची ग्वाही डॉ. म्हैसेकर यांनी दिली. 

रुग्णवाहिकांची जबाबदारी बकोरियांकडे
रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही म्हणून रविवारी एका महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी शासकीय रुग्णवाहिका वेळेवर येत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, असा मुद्दा मांडला. त्यावर डॉ. म्हैसेकर यांनी राज्याच्या क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला.

loading image