MPSC Student Agitation : पेपरच फुटणार असतील तर आमच्या भविष्याचे काय? - एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

दिवस-रात्र अभ्यास करून सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर परीक्षा पारदर्शक होण्याचीच चिंता उभी राहत आहे.
MPSC Student Agitation

MPSC Student Agitation

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - गावाकडून आई-वडील पोटाला चिमटा देत काढून मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. दिवस-रात्र अभ्यास करून सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मात्र परीक्षा पारदर्शक होण्याचीच चिंता उभी राहत आहे. पेपरच फुटणार असतील, तर आमच्या कष्टांचे आणि आई-वडिलांच्या स्वप्नांचे काय? असा सवाल करत ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. ८) एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com