esakal | वशिला असेलतर आळंदीत मिळतेय माऊलींचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Dnyaneshwar Maharaj

वशिला असेलतर आळंदीत मिळतेय माऊलींचे दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या (Sant Dnyaneshwar Mauli) समाधी मंदिराचा देऊळवाडा वर्षभरापासून बंद आहे. कोविडच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारच्या आदेशामुळे अद्याप मंदिराचे (Temple) दरवाजे उघडले नसले तर तरी स्थानिक पातळीवर मात्र पोलिसांचा बंदोबस्त असूनही माऊलींच्या मंदिरात प्रवेश मिळणे सोपे झाले आहे. (If There is Favour You Can See Mauli in Alandi pjp78)

कुणाचा वाढदिवस आला, कुणी देणगीदार आहे, कुणी गावकारभारी आहे, कुणी नातेवाईक आहे, अशी विविध कारणे सांगून सध्या मंदिर प्रवेश मिळविणे सोपे झाले. पुजारी असो मंदिराचा शिपाई याला अपवाद कोणी नाही. दुपारच्या सत्रात जेवणाच्या पंगतीलाही अनेक लोकांना सोडले जात आहे.

पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे म्हणाले, प्रस्थानानंतर थेट समाधी दर्शन बंद ठेवले आहे. समाधी गाभाऱ्यात कुणालाच प्रवेश नाही. नियमांचे काटेकोर अंमलबजावणी केली जाते. सीसीटीव्ही यंत्रणा तपासून चौकशी केली जाईल.

loading image