पुणेकर असाल तर 'या' चार पॉडकास्‍ट्स ऐकण्‍याचा आनंद नक्‍की घ्या! Podcast | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकर असाल तर 'या' चार पॉडकास्‍ट्स ऐकण्‍याचा आनंद नक्‍की घ्या!

पुणेकर असाल तर 'या' चार पॉडकास्‍ट्स ऐकण्‍याचा आनंद नक्‍की घ्या!

पुणे शहराला आयटी हब्‍स, ऑटोमोबाइल व उत्‍पादन केंद्रे आणि अर्थातच, पुणे शहराची संपन्‍न संस्‍कृती – चित्रपटगृह, चित्रपट, संगीत यांचा अभिमान आहे. लॉकडाऊनपासून या शहरामध्‍ये पॉडकास्‍ट्सच्‍या वाढत्‍या लोकप्रियतेला नवीन रूप मिळाल्‍याचे दिसून आले. व्हिडिओ ओटीटी क्षेत्रावर मनोरंजनासाठी व्‍यापक कन्‍टेन्‍ट असताना देखील ऑडिओ माध्‍यमाकडे सकारात्‍मक कल दिसण्‍यात आला आहे. नुकतेच सादर करण्‍यात आलेल्‍या केपीएमजी रिपोर्टनुसार कोरोना महामारीच्‍या पहिल्‍या वर्षामध्‍ये भारतात पॉडकास्‍टचा आनंद घेण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये २९.३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली. या काळादरम्‍यान पुणे-केंद्रित व मराठी कन्‍टेन्‍टसंदर्भातील पॉडकास्‍ट्समध्‍ये देखील वाढ दिसली. तुम्ही पुणेकर असाल तर या चार पॉडकास्‍ट्स ऐकण्‍याचा आनंद नक्‍की घ्या!

- पुणेकर पॉडकास्‍ट

https://audiowallah.com/podcast/the-punekar-podcast येथे उपलब्‍ध.

१०,००० हून अधिक साप्‍ताहिक श्रोत्‍यांसह 'दि पुणेकर पॉडकास्‍ट' शहरातील यशस्‍वी व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या संबंधित क्षेत्रांमधील यशस्‍वी कामगिरीसाठी सन्‍मानित करतो. सध्‍या तिसरा सीझन असलेल्‍या या शोमध्‍ये जीवनाच्‍या सर्व स्‍तरांमधील प्रख्‍यात व्‍यक्‍ती आहेत, जसे समीर बेलवलकर, राहुल सोलापूरकर, प्रफुल चंदावरकर, अमित परांजपे आणि इतर अनेक.

-कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही

https://audiowallah.com/podcast/coffee-cricket-aani-barach-kaahi येथे उपलब्‍ध.

इतर कोणत्‍याही खेळांच्‍या तुलनेत क्रिकेट हा भारतीयांसाठी जीव की प्राण असा खेळ आहे. वाढत्‍या लीग्‍ज, या खेळांच्‍या माध्‍यमातून येणा-या नवीन खेळाडूंसह लोकांमध्‍ये सामन्‍याची सविस्‍तर माहिती, रोचक ट्रिव्हिया आणि क्रिकेटर्सच्‍या कथा जाणून घेण्‍याबाबत रूची वाढली आहे. 'कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही' क्रिकेटप्रेमींशी समर्पित असलेला शो आहे. सर्वात मोठे मराठी क्रिकेट पॉडकास्‍ट म्‍हणून शोच्‍या साप्‍ताहिक रीलीजमध्‍ये बातम्‍या आणि अमोल मुझुमदार, प्रविण आमरे, संजय मांजरेकर यांसारख्‍या अतिथींसोबतच्‍या मुलाखतींचा समावेश आहे. शोने १५ महिन्‍यांमध्‍ये जवळपास १५० एपिसोड्स पूर्ण केले आहेत आणि जागतिक स्‍तरावर १५,००० हून अधिक मराठी क्रिकेटप्रेमींपर्यंत साप्‍ताहिक पोहोच आहे.

- छत्रपती शिवाजी महाराज

https://audiowallah.com/podcast/chhatrapati-shivaji-maharaj येथे उपलब्‍ध.

नावाप्रमाणे हा पॉडकास्‍ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जीवनकथेला सादर करतो. पहिल्‍या सीझनने श्रोत्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख करून दिली, तर दुस-या सीझनने त्‍यांचे सर्व गड, गडांच्‍या उभारणीमागील शास्‍त्र, ठिकाणे आणि मराठा साम्राज्‍याची निर्मिती याबाबतची माहिती सांगण्‍यावर भर दिला. या शोचा तिसरा सीझन डिसेंबरमध्‍ये रीलीज होण्‍यास सज्‍ज आहे. हा शो भारतातील अव्‍वल ५ मराठी पॉडकास्‍ट्समध्‍ये सामील आहे आणि भारतातील ३० हजारांहून अधिक श्रोत्‍यांपर्यंत पोहोचचा आनंद घेतो.

- वादच नाही

https://audiowallah.com/podcast/vaadach-nahi येथे उपलब्‍ध.

संस्‍कृती-संपन्‍न शहरामध्‍ये पु.ल. देशपांडे यांसारख्‍या प्रसिद्ध व्‍यक्‍तींच्‍या साहित्यिक कार्याला सादर करणारे पॉडकास्‍ट 'वादच नाही' मराठी साहित्‍याला एक मानवंदना आहे. हा शिकण्‍याचा, शोधण्‍याचा, नवीन पैलूंचा आणि त्‍यांच्‍या महान कार्यांना सतत स्‍मरणात ठेवण्‍याचा प्रवास आहे. विनीत अलुरकर, भुपाल लिमये आणि ध्रुव भाटे यांचे सुत्रसंचालन असलेला हा शो पु्.ल. यांच्‍या काही महान कार्यांना पुन्‍हा सादर करतो. पु्.ल. देशपांडे यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी हा शो सुरू करण्‍यात आला आणि मराठी समुदायातील सर्व वयोगटाच्‍या लोकांपर्यंत पोहोचतो.

loading image
go to top