दखल न घेतल्यास कारवाई करणार - आयुक्त व्यंकटेशम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे - ‘‘पोलिस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण सुरू आहे, त्यामुळे त्यांच्यात सुधारणा होत आहेत. तरीही पोलिस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, तसे न झाल्यास योग्य कारवाई करू,’’ असे पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट केले.

पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार देण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वाईट वागणूक मिळते. त्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यावर ‘सकाळ’ने  ‘पोलिसी दिरंगाई’ या मालिकेद्वारे प्रकाश टाकला. त्यामध्ये अनेक नागरिकांनी त्यांना पोलिस ठाण्यात आलेले अनुभव ‘सकाळ’ला सांगितले. 

डॉ. व्यंकटेशम म्हणाले, ‘‘पोलिस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरवात केली आहे. तसेच प्रशिक्षणावरही भर दिला जात आहे. वरिष्ठ अधिकारी संबंधित पोलिस ठाणे, पोलिस चौकीच्या कामांवर देखरेख ठेवणार आहेत. त्यामुळे लवकरच मोठा बदल झालेला दिसेल.’’

‘जनता दरबार’ची गर्दी कमी झाली!
सर्वसामान्य नागरिक त्यांची पोलिसांबाबतची गाऱ्हाणी जनता दरबारमध्ये मांडतात. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये संबंधित विषयांवर चर्चा होते. त्यामधून अनेक समस्या सोडविण्यास मदत होऊ लागली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून जनता दरबारमध्ये तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आता तर अत्यल्प तक्रारी येत असल्याचे डॉ. व्यंकटेशम यांनी स्पष्ट केले.

Web Title: If you do not take action then take action says Police Commissioner Dr. K. Venkatesham

टॅग्स