

Pune Road Encroachment
esakal
पुणे - शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर आणि महापालिकेच्या जागांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे.
या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून जुजबी कारवाई केली जाते. कारवाईपूर्वी अतिक्रमण काढून घ्या असे निरोप पाठवले जातात. अशी स्थिती असताना अतिक्रमण विभागाने अपुरे मनुष्यबळ असलेल्याचे कारण देत आणखी ८० कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.