esakal | IISER Pune Fire : संशोधकांच्या सजगतेमुळे टळला मोठा अनर्थ
sakal

बोलून बातमी शोधा

 IISER Fire

IISER Pune Fire : संशोधकांच्या सजगतेमुळे टळला मोठा अनर्थ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) मुख्य इमारतीतील सेंद्रिय रसायनशास्त्र प्रयोगशाळेला शुक्रवारी दुपारी १२ वाजता आग लागली. त्या वेळी प्रयोगशाळेत तीन ते चार संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. प्रयोग करण्यासाठी तयार केलेल्या एक्झॉस्ट चेंबरमध्ये ही आग लागली. त्यानंतर संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अतिशय शिताफीने केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

प्रयोग करताना रसायनांशी निगडित कारणामुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी संशोधक विद्यार्थी सांगतो. तो म्हणाला, ‘आग लागल्याबरोबरच आम्ही तातडीने प्रयोगशाळेतील कार्बन डायऑक्साइड आणि वाळूचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. ज्या मुलाच्या कपड्यांवर आग पेटली होती. त्याला अ‍ॅप्रनने गुंडाळून ती आग आटोक्यात आणली. त्यामुळे त्याला फार काही इजा झाली नाही. मात्र चेंबरच्या माध्यमातून आग पसरत गेली.’

हेही वाचा: रफल साडी नेसून स्टायलिश दिसायचंय? लक्षात ठेवा 'या' गोष्टी

प्रयोगशाळेतील एक्झॉस्ट चेंबर एकमेकाला जोडलेला असून, मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा तेथे बसविण्यात आली आहे. जेव्हा चेंबरचा वरचा भाग पेटला त्यानंतर त्याच्याशी जोडलेले अंतर्गत वायरिंग, छत, वातानुकूलन यंत्रणेतील साहित्य आदींनी पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी संशोधक सांगतात.

आग आटोक्याबाहेर जातेय हे लक्षात येताच सर्वांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. तसेच ज्वलनशील गॅसचे सिलिंडर प्रयोगशाळेबाहेर आणण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी साडेबारा वाजता दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर दुपारी अडीच वाजेपर्यंत आग आटोक्यात आली.

loading image