Pune News : बेकायदा जाहिरात बिल्डरला पडली ३० लाखाला; महापालिकेने ठोठावला दंड

महापालिकेच्या पथदिव्यांवर बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्या वडगाव शेरीतील बांधकाम व्यावसायिकाला प्रशासनाने चांगलाच दणका दिला.
Illegal Advertisement

Illegal Advertisement

sakal

Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या सर्व नियम पायदळी तुडवत महापालिकेच्या पथदिव्यांवर बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्या वडगाव शेरीतील बांधकाम व्यावसायिकाला प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. त्यास ३० लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर दुसऱ्या कारवाईत आणखी एकाला दीड लाखाचा दंड केला आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने जाहिराती करणाऱ्या व्यावसायिकांना चाप बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com