esakal | अनधिकृत फलकांवर पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडून कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

advertising

अनधिकृत फलकांवर पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडून कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केशवनगर : केशवनगर मुंढवा परिसरामध्ये अनाधिकृत जाहिरात फलकांवर पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्यामुळे बोर्ड काढताना तो शिवाजी चौकात रस्त्यावर उतरवण्यात आल्यामुळे चारी बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. ही वाहतुकीची कोंडी सोडविताना वाहतूक पोलीस,मुंढवा पोलीस व पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पोलीस यांची त्रेधातिरपिट उडाली.

परवाला परवाना आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त विजय लांडगे तसेच परिमंडळ चारचे उपायुक्त संदीप कदम व हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा केशवनगर येथील अनधिकृत फलकांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. यावेळी या विभागाने किर्तनेबागेतील 40बाय 20,केशवनगर ओढ्याच्या पुलावरील 40बाय 40 चे दोन,40बाय 20 चा एक असे चार होर्डिंग निष्कासन करण्यात आले. याप्रसंगी परवाना निरीक्षक मोग्लाप्पा धनगर व राजेंद्र बडदे, अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू, रामदास शेळके, कैलास शेलार, दीपिका थोरात कारवाई त सहभागी होते. याप्रसंगी क्रेन व गँस कटर चा वापर करण्यात आला.

वाहतक कोंडी सोडविण्यास पोलिसांचा आर्धा तास खर्ची पडला.

loading image
go to top