

Illicit Liquor Tragedy: Toxic Alcohol Scam Traced Back to Uruli Kanchan Operations
Sakal
सुनील जगताप,
उरुळीकांचन : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारुने २२ जणांचा बळी गेल्यानंतर,उरुळी कांचन येथील दारुभट्टीतून उत्पादीत होऊन विक्रीसाठी बाहेर गेलेल्या विषारी दारुने उरुळी कांचन येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.विषारी दारुने मृत्यूमुखी पडलेला तरुण एका खाजगी दवाखान्यात शुक्रवार(दि.२९) रोजी सकाळपासून उपचारासाठी दाखल होता अशी माहिती उजेडात आली.खाजगी रुग्णालय सूत्रांनी विषारी दारू सेवणाने रुग्णाचा मृत्यू झाल्याला पुष्टी दिली असून विषारी दारु व त्यात भेसळीचे उगमस्थान उरुळी कांचन असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.