Crime
esakal
शिरूर - कारेगाव (ता. शिरूर) येथे बेकायदेशीरपणे भिशी चालवून, दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे अमीष दाखवित जवळपास ३९ जणांकडून वीस कोटींहून अधिक रक्कम जमा करून त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तीन महिलांसह पाचजणांविरूद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भिशीच्या माध्यमातून केलेल्या मोठ्या फसवणूकीचा प्रकार उघडकीस आल्याने कारेगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.