वडगाव शेरी : पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग आणि अतिक्रमण विभाग यांनी संयुक्त कारवाई करीत सोमनाथनगर ते वडगाव शेरी गावठाणापर्यंतच्या रस्त्यावरील 17 हजार चौरस फुटांचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले. त्यामुळे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.