भूगाव येथील पाच मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
Illegal Construction
Illegal ConstructionSaksal

पुणे : भूगाव (ता. मुळशी) येथील पाच मजली अनधिकृत इमारत मंगळवारी (ता. ११) जमीनदोस्त करण्यात आली. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. (Illegal Construction In Pune)

‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील भूगाव परिसरातील सुमारे ११ हजार स्क्वेअर फुटाचे शॉपिंग कॉम्प्लेक्सचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. ‘पीएमआरडीए’चे अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. कारवाईदरम्यान, स्थानिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, अशी माहिती ‘पीएमआरडीए’च्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या प्रमुख मोनिका सिंह यांनी दिली.

Illegal Construction
वैद्यकीय पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया १३ जानेवारीपासून सुरू

बांधकाम करण्यापूर्वी ‘पीएमआरडीए’मार्फत परवानगी घेण्यात यावी. अनधिकृत बांधकाम केल्यास संबंधितांकडून बांधकाम पाडण्यासाठी येणारा खर्च वसूल करण्यात येईल. तसेच, परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com