

मुंढवा जमीन गैरव्यवहार: शीतल तेजवानीची अटक मुंबई उच्च न्यायालयाकडून 'बेकायदा' घोषित; बावधन पोलिसांवर ठेवला ठपका
Sakal
पुणे : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात कोट्यवधींचे मुद्रांक शुल्क चुकवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी शीतल तेजवानीला बावधन पोलिसांनी केलेली अटक आणि पुणे न्यायालयाने दिलेली पोलिस कोठडी मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवली आहे. न्यायालयाने तेजवानीला ५० हजार रुपयांच्या चातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.